Talegaon : ‘ द कॉन्शिअस’ या नाटकाद्वारे कलापिनीच्या सवलत नाट्य योजनेला प्रारंभ

एमपीसी न्यूज – मावळातील दर्दी रसिक प्रेक्षकांना भरभरून आनंद मिळावा आणि त्यांना वेगवेगळ्या कलाकृतींचा  आस्वाद घेता यावा यासाठी  तळेगावच्या कलापिनी संस्थेने सवलत नाट्य योजना  सुरु केली आहे. शनिवार  दि.  17  फेब्रुवारी  रोजी  नंदी थिएटर प्रस्तुत, अमेय दक्षिणदास लिखित दोन अंकी मराठी नाटक, ‘ द कॉन्शिअस’ या गूढ नाटकाच्या प्रयोगाने कै.डॉ.शं.वा. परांजपे नाट्यसंकुलात या योजनेला प्रारंभ झाला.

व्यावसायिक, निमव्यावसायिक,  स्पर्धांमधील गाजलेली नाटकं ,सभासदांना आणि रसिकांना सवलत शुल्कात दाखवणे, तसेच गुणी पण अप्रसिद्ध कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हा या योजनेचा  उद्देश आहे.

Akurdi : आकुर्डी येथे शिवजयंती साजरी

याविषयी बोलताना डॉ . अनंत परांजपे म्हणाले ,  ही योजना राबवण्याचं प्रयोजन म्हणजे अधिकाधिक नाटकं प्रेक्षकांपर्यंत पोहचावीत.

 घरात लावलेल्या एका खूप जुन्या ऐतिहासिक पेंटिंगमुळे आयुष्यात होणारी उलथापालथ आणि गूढ मृत्यू या  कथानकाभोवती ‘ द कॉन्शिअस’  हे नाटक फिरतं. खूप वेगळ्या विषयावरील हे नाटक रसिकांना खूप आवडलं. यातील कलाकार संदीप समर्थ,  अनंत सताळकर आणि प्रिया सातपुते यांनी  छान  भूमिका  केल्या.

संदीप समर्थ यांनी दिग्दर्शित केलेलं हे पहिलंच नाटकं अतिशय सुंदर आणि लक्षणीय होतं. प्रकाश योजना प्रसाद मर्ढेकर यांची होती तर संगीत चेतन पंडित यांनी दिले होते. रंगमंच व्यवस्था शार्दूल गद्रे, चेतन पंडित, प्रसाद वायकर आणि सायली रौंधळ यांनी केली होती. सर्व व्यवस्थापनात  रामचंद्र रानडे , रश्मी पांढरे आणि सहकारी यांचे सहकार्य लाभले.

कलापीनीने  दिलेल्या सहकार्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल संदीप समर्थ यांनी  कलापिनीचे आभार मानले .कलापिनीचे अध्यक्ष  विनायक अभ्यंकर, विश्वस्त   अनंत परांजपे, उपाध्यक्ष   अशोक बकरे, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे, कला मंडळ प्रमुख  चेतन शहा त्याचबरोबर सह सचिव  विनायक भालेराव यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. अनेक रसिक प्रेक्षकांनी या नवीन योजनेचा लाभ घेत खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.