Mumbai : रेडिओ जगतातील प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

एमपीसी न्यूज –  रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय निवेदक ( Mumbai) अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 91  वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अमीन यांचा मुलगा राजिल याने निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Akurdi : आकुर्डी येथे शिवजयंती साजरी

‘बिनाका गीतमाला’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे अमीन सयानी  हे भारतातील घराघरांत लोकप्रिय झाले. त्यांची  ‘बहनों और भाइयों’ असं म्हणत संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात खूप प्रसिद्ध होती. अमीन सयानी यांच्या नावावर तब्बल 54 हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती/कम्पेअर/व्हॉईसओव्हर करण्याचा विक्रम आहे.

जवळपास 19000 जिंगल्सना त्यांनी आवाज दिला आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. त्यांनी भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये  ( Mumbai)अनाऊंसर म्हणून काम केलं होतं. रेडिओवर सेलिब्रिटींवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा’ खूप लोकप्रिय झाला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.