Talegaon News : तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे पाणी टंचाई विरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज- तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आज (दि.26 मे) तळेगाव नगरपरिषद या ठिकाणी पाणी टंचाई विरोधात धडक मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. तळेगाव स्टेशन भागात नागरिकांना कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा होत असून जाणीवपूर्वक कुत्रिम पाण्याचा तुटवाडा व टंचाई कर्मचाऱ्यांमार्फत केली जात आहे अशी तक्रार आंदोलक कर्त्यांकडून करण्यात आली.

दरम्यान, नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून पाण्याच्या टँकरने पाणी खरेदी करावे लागतं आहे. तळेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप खराब झालेले आहेत व ते लवकरात लवकर दुरुस्ती करावे असे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना देण्यात आले असून त्यांनी येत्या शनिवारी या विषयावरसविस्तर बैठक घेण्यात येणार असून आंदोलन थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

तळेगाव शहर चे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे व महिला अध्यक्ष शैलेजा काळोखे यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलन झाले. सदरच्या आंदोलनामध्ये मुख्यउपस्थिती मावळराष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, PMRD सदस्य संतोष भेगडे,दीपालीताई गराडे,मा.नगरसेवक किशोर भेगडे, सुरेश धोत्रे, कृष्णाकारके, अरुण माने, नंदू कोतुळकर व जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी शहर वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष खांडगे,महिला कार्याध्यक्ष अर्चना ताई दाभाडे स्टेशन विभाग अध्यक्ष करण शेळके,सोशल मीडिया अध्यक्ष गणेशनिळकंठ, युवती अध्यक्ष श्रुतिका कांबळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष बाबा भाई मुलाणी तळेगाव दाभाडे अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेलसिकीलकर,युवक अध्यक्ष अल्पसंख्याक शारुख नईम शेख, तसेच पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला,युवती पदाधिकारी आंदोलनासाठी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.