Dehuroad Crime News : पहिल्या मुलीच्या पालन पोषणाच्या जबाबदारीवरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारीवरून सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण करून छळ केला. पतीला दारूचे व्यसन असल्याचे विवाहितेपासून लपवून ठेवले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2011 ते 25 मार्च 2022 या कालावधीत वाशीम येथे घडला.

सासरे सत्यनारायण टाक, दीर आनंद टाक, सासू आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी वाशीम येथे नांदत असताना फिर्यादी यांच्या पहिल्या पत्नीची मुलीच्या पालन पोषणावरून फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली. फिर्यादीचा दोन वेळा आरोपींनी गर्भपात केला. फिर्यादीच्या पतीला लग्नापूर्वी दारू पिण्याचे व्यसन होते ही बाब लपवून ठेवली. पतीने दारू पिऊन सासरी आणि माहेरी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने माहेरी आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.