Talegaon News : राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अमर खळदे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अमर(जितेंद्र) तानाजी खळदे यांची नियुक्ती करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
सचिव मयुर ज्ञानेश्वर पिंगळे, खजिनदार विराज विश्वास टोंगळे म्हणून कार्य करतील तसेच सदस्यपदी तळेगाव दाभाडे शहर शिवसेना प्रमुख दत्तात्रय भेगडे, अमोल पाटील, आदित्य खंडूजी टकले, सागर गुलाबराव टकले, धनंजय तुकाराम काटे, संदीप गडसिंग, प्रथमेश विजय शेटे, ओंकार दत्तात्रय पिंजण, चैतन्य मंगेश जोशी, स्वप्नील पद्माकर माने, आदित्य सतीश पारखे, शार्दुल संजय शिंदे, सागर मच्छिंद्र लगड, गौरव राजेंद्र खळदे, यांची नियुक्ती करण्यात आली.

या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक खंडू टकले, संस्थापक सदस्य संजय शिंदे, विजय शेटे, विश्वास टोंगळे, विनोद टकले, संतोष परदेशी, ऑडिटर अभिजीत काळे यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष अमर खळदे यांनी या पुढे प्रतिष्ठान सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरण, धार्मिक तसेच समाजहिताचे कार्य करेल असे स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.