Talegaon News : कोरोना मृतदेहावर अंत्यसंसकार करणाऱ्या योद्धयांना पीपीई कीटचे वाटप

कोरोना योद्धयांच्या सुरक्षेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून पीपीई कीट देणे हे आपले कर्तव्य आहे', असे आमदार शेळके यावेळी म्हणाले.

एमपीसीन्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे Covid-19 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 200 पीपीई कीट देण्यात आले.

‘कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित मृताच्या कुटुंबातील कोणालाही अंत्यसंस्कार करता येत नाही. परंतु नगरपरिषदेचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत.

अशा कोरोना योद्धयांच्या सुरक्षेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून पीपीई कीट देणे हे आपले कर्तव्य आहे’, असे आमदार शेळके यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार सुनिल शेळके, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, संतोष शेळके अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, संस्थापक रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी विलास काळोखे,   चंद्रभान खळदे, सचिव दिपक फल्ले, प्रकल्पप्रमुख मनोज ढमाले, संदीप  गराडे व इतर सर्व रोटरीयन्स उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.