Talegaon News : नगरपरिषदेतील सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार

एमपीसी न्यूज -तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध समिती सदस्य व सभापती पदाच्या निवडणुका सर्व पक्षाच्या गटांनी समन्वयाने बिनविरोध पार पडल्या.या निवडणुकांमध्ये पक्षभेद दूर ठेऊन सर्व पदे आपापसात विभागून घेतली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विषय समिती सदस्य व सभापती पदाच्या निवडणुकीचे पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार मधुसूदन बर्गे व त्यांना सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी दीपक झिंजाड व उपमुख्यधिकारी  सुप्रिया शिंदे यांनी काम पाहिले.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे 13 सदस्य, जनसेवा विकास समिती  7 सदस्य, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे 7 सदस्य असे पक्ष बलाबल आहे.या पक्ष बळानुसार प्रत्येक समिती मध्ये भाजपसाठी  3 सदस्य,  जनसेवा विकास समिती व तळेगाव सुधारणा व विकास समिती मध्ये दोन सदस्य असे सर्व समित्यांमध्ये सदस्य निवडून आले आहेत. तर स्थायी समितीमध्ये प्रत्येक गटातील 1 सदस्याची वर्णी लागली आहे.
निवडणुकी नंतर बिनविरोध निवडून आलेल्या सर्व समितीच्या सदस्यांचे व सभापतीचे अभिनंदन यावेळी सभागृहात नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले. तसेच नंतर जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, सुनिल पवार, मिलिंद अच्युत,अनिल पवार, सविंद पाटील आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या निवडणुकीमध्ये खालील सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II
1) सार्वजनिक बांधकाम समिती -निखिल उल्हास भगत (सभापती) ,काजल गटे, शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, रोहित लांघे,संतोष भेगडे, अरुण माने.
 2) पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीमध्ये  उपनगराध्यक्ष पदसिद्ध सुशील ज्ञानेश्वर सैंदाणे (सभापती), नीता काळोखे ,अरुण भेगडे पाटील, संग्राम काकडे ,गणेश खांडगे, किशोर भेगडे, गणेश काकडे
 3) शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती – अनिता अनिल पवार (सभापती), अरुण भेगडे पाटील,संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, सुलोचना आवारे, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे.
 4) नियोजन व विकास समिती- कल्पना सुरेश भोपळे (सभापती), संतोष शिंदे, संध्या भेगडे, संग्राम काकडे ,गणेश खांडगे, बापूसाहेब भेगडे,संतोष भेगडे.
 5) स्वच्छता वैद्यक व आरोग्य समिती- किशोर छबुराव भेगडे (सभापती), संतोष शिंदे, नीता काळोखे,मंगल जाधव ,रोहित लांघे, गणेश खांडगे, अरुण माने.
 6) महिला व बालकल्याण समिती – हेमलता चंद्रभान खळदे (सभापती),शोभा अरुण भेगडे (उपसभापती),प्राची हेंद्रे,मंगल जाधव, सुलोचना आवारे,वैशाली दाभाडे, संगीता शेळके.
 7) स्थायी समिती – या समितीवर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे या पदसिद्ध (सभापती) असून सर्व समितीचे सभापती सदस्य राहतात.तसेच प्रत्येक गटातील एक याप्रमाणे गणेश काकडे,अमोल शेटे,गणेश खांडगे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1