Talegaon News : सरस्वती विद्या मंदिरची चौदा मुले शालांत परीक्षेत 90 टक्क्यांच्या वर

एमपीसी न्यूज – सन 2020 – 2019 या शैक्षणिक वर्षात कोविड 19 अंतर्गत शालांत परीक्षा रद्द झाल्यामुळे शालांत परीक्षांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लागला असून सरस्वती विद्या मंदिर या शाळेने वर्षभरात ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या चाचणी, प्रथम सत्र, द्वितीय सत्र व पूर्व परीक्षा घेतल्या होत्या. शासन आदेशानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

यात रिद्धी दादासाहेब पाटील ही विद्यार्थिनी 97.60 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. सिद्धि दादासाहेब पाटील ही विद्यार्थिनी 96.80 टक्के गुण मिळवून शाळेत दुसरी आली (कु.रिद्धी व सिद्धि या दोन्ही जुळ्या बहिणी आहेत) तर सिद्धेश धैर्यशील पंडित हा विद्यार्थी 96.20 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरा आला. एकूण एकशे एक विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 14 विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळाले असून उदयन पाळेकर यास गणित विषयात 100 गुण मिळाले आहेत तर गणेश मुद्गुण या विद्यार्थ्यास समाजशास्त्र विषयात 100० गुण मिळाले आहेत.

शाळेने अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावलेला निकाल समाधानकारक असल्याचे मत पालकांनी मांडले .

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल मुख्याध्यापिका रेखा परदेशी, संस्था अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे, कार्यवाह प्रमोद देशक, शिक्षण समिती सदस्य डॉक्टर ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.