Talegaon News :  वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मदत करा – आमदार सुनील शेळके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

0

एमपीसीन्यूज – कोरोना काळात अनेकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आपल्यापरीने शक्य ती मदत करुन माझा वाढदिवस करावा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

मावळ तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक सहकारी व कार्यकर्ते माझा वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक आहेत. परंतु, मागील आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गजन्य जागतिक महामारीचा सामना आपण करीत आहोत.

मी आमदार व्हावे यासाठी स्वप्न पाहणारे काही वडीलधारी ज्येष्ठ व्यक्ती व माझ्यावर प्रेम करणारे तरुण सहकारी या कोरोनाच्या महामारीत मी गमावले आहेत. तरी या परिस्थितीत मी वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, नसल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

या कोरोना काळात अनेकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आपल्यापरीने जी मदत करता येईल ती करुन माझा वाढदिवस साजरा केला, तर त्याचे मला निश्चितच समाधान वाटेल.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता येत्या २० ऑक्टोबरला मला आशीर्वाद व शुभेच्छा देण्याकरिता प्रत्यक्ष येऊ नये, मी फेसबुक लाईव्हद्वारे सकाळी दहा ते बारा यावेळेत आपल्या सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीन, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.