-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon News : सरस्वती विद्यामंदिरचा उदयन पाळेकर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 25 वा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यामंदिरचा विद्यार्थी व वडगाव मावळ येथील रहिवासी उदयन कुलदीप पाळेकर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 25 वा आला आहे.

नोव्हेंबर 2020-21 मध्ये झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत सरस्वती विद्यामंदिरचा उदयन कुलदीप पाळेकर हा विद्यार्थी राज्यात 25 वा आला असून मावळ तालुक्यातून पात्र झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे.

या परीक्षेचा शाळेचा निकाल 70 टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे, सदस्य विश्वास देशपांडे, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, वर्ग शिक्षिका सुरेखा रासकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेस उदयनला शुभेच्छा दिल्या.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn