Talegaon : ” शिल्पकलेतुन आत्मानंदाचे दर्शन घडते ”-  भाग्यश्री काळे पाट्सकर

एमपीसी न्यूज – ”समाजातील  सर्व प्रकारच्या (Talegaon) लोकांना आनंद घेता यावा यासाठी मंदिरांमधुन विविध प्रकारची शिल्पे कोरली गेली. या शिल्पांचा नृत्य व नाट्य यांच्याशी घनिष्ट संबंध आहे.  साहित्य , संगीत , नृत्य व नंतर ,शिल्प अशा रितीने कलांचा विकास झालेली आढळतो. त्यामुळे शिल्पांमधुन सुर , ताल , लय् , नृत्य व  साहित्य या सगळ्यांचा सुरेख संगम पहायला मिळतो ‘ असे विचार डॅा. भाग्यश्री काळे पाटसकर यांनी व्यक्त केले .तळेगावातील सृजन नृत्यालय व परिक्रमा कथक डान्स स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित्  नृत्यमेध या उपक्रमांतर्गत  त्या बोलत होत्या.

सृजन नृत्यालयाच्या डॅा. मीनल कुलकर्णी व परिक्रमा कथक डान्स स्कुल च्या मानसी दांडेकर यांनी मिळुन नृत्यमेध या उपक्रमाची सुरुवात केली आहे. नृत्याच्या अभ्यासात परिपक्वता येण्यासाठी नृत्याला पुरक अशा विविध विषयांचे ज्ञान व माहिती असणे आवश्यक असते असे विविध विषय मान्यवर तज्ञांच्या मार्गदर्शनातुन विद्यार्थीनींपर्यंत पोहचावेत या उद्देशाने नृत्यमेध या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यातील पहिले  व्याख्यान नुकतेच संपन्न झाले ज्यात   ”शिल्पांची नृत्यभाषा” हा विषय डॅा. भाग्यश्री काळे पाटसकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व रंजक पध्द्तीने मांडला.

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्या संयुक्त कृतीने शिक्षक दिन साजरा

डॅा, भाग्यश्री पाटसकर यांनी पुरातत्व शास्त्र या विषयात पी. एचडी केलेली असुन  इंडोलोजी या विषयात त्या MA M.Phil आहेत.अश्म युगापासुन असलेले नृत्य कलेचे अस्तित्व , विविध प्राचीन ग्रंथात असणारे नृत्याचे उल्लेख्  व शिल्पांमधुन दाखवल्या गेलेल्या विविध भावना त्यांनी दृक श्राव्य माध्यमातुन शिल्पांचे फोटो दाखवत अधिक स्पष्ट करुन सांगितल्या. तसेच वेरुळ व महाबलीपुरम येथील शिल्पे व त्यातुन घडणारे पौराणिक कथांचे नाट्यमय दर्शन्, शिल्पांमध्ये आढळणारे विविध रस व व्यक्तीरेखा याचीही अतिशय महत्वपुर्ण माहिती त्यांनी दिली.

शेजार ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनंतराव चाफेकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. मानसी दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॅा. मीनल कुलकर्णी यांनी आभार मानले. तंत्र सहाय्य केदार अभ्यंकर यांनी केले. सृजन व परिक्रमा च्या अनेक विद्यार्थीनींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. तळेगाव व परिसरात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच  उपक्रमाला विद्यार्थी, पालक व अभ्यासु रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद (Talegaon) लाभला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.