Talegaon : टॉप टेक कंपनीमध्ये तळेगाव बडी कॉपची बैठक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील टॉप टेक कंपनीमध्ये आज, सोमवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन बडी कॉप यांच्यामार्फत सुरक्षेच्या अनुषंगाने महिलांची बैठक घेण्यात आली.

बैठकीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, संध्या देशपांडे, मुस्कान बनकर, रेखा देवी, जयश्री वाघमारे, टॉप टेकचे महेश महाजन व अधिकारी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी बैठकीत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अत्यावश्यक वेळी त्वरित पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. महिलांचा व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यामध्ये सर्व महिलांना सहभागी करून घेण्यात येईल. त्याद्वारे देखील महिलांना तक्रार करता येईल. तळेगाव दाभाडे पोलिसांनी 9356336324 हा व्हाट्स अप क्रमांक सुरु केला असल्याचेही वाघमोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.