Talegaon : घरफोडी करून पिठाची गिरणी लंपास

एमपीसी न्यूज – खिडकीची काच उचकटून चोरट्यांनी पिठाची गिरणी, टीव्ही, संगणक आणि दोन नादुरुस्त लॅपटॉप चोरून नेला. ही घटना 22 फेब्रुवारी 2019 रोजी कडोलकर कॉलनी येथे उघडकीस आली. याबाबत रविवारी (दि. 3) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललित मधुसूदन प्रभू (वय 67, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललित यांचे घर 14 ऑक्टोबर 2018 ते 22 फेब्रुवारी 2019 या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या शेजारी असलेल्या बंद खिडकीची काच उचकटून घरात प्रवेश केला.

घरातून पिठाची गिरणी, टीव्ही, संगणक आणि दोन नादुरुस्त लॅपटॉप असा एकूण 15 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सपकाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.