Talegaon : मोहरमच्या पार्श्वभूमीवर तळेगाव पोलिसांचा रूट मार्च

एमपीसी न्यूज – मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी (दि. 28) शहरात (Talegaon ) रूट मार्च केला. मारुती मंदिर चौक, तेली आळी चौक, राजेंद्र चौक, जामा मस्जिद, गणपती चौक, शाळा चौक, सुभाष चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक या या मार्गावर रूट मार्च केला.

Alandi : जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण

शनिवारी (दि. 29) मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम सण आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागण्याच्या उद्देशाने तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रूट मार्च केला.

रूटमार्च मध्ये तळेगाव दाभाडे शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, 15 अंमलदार व एसआरपीएफ एक कंपनी (25 जवान) सहभागी (Talegaon ) झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.