Talegaon : युनियन बँकेच्या पत्रव्यवहारात शहराचा उल्लेख झाला ‘तळेगाव दाभाडे’

एमपीसी न्यूज – युनियन बँक ऑफ इंडिया, तळेगाव दाभाडे शाखेच्या व्यावहारिक पत्रव्यवहारात तळेगाव दाभाडे शहराचा उल्लेख ‘तळेगाव दबाडे’ असा होत होता. याबाबत आमदार सुनील शेळके यांनी बँकेला निवेदन देऊन शहराचा नामोल्लेख दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन करून बँक व्यवस्थापनाने शहराचा नामोल्लेख ‘तळेगाव दाभाडे’ असा दुरुस्त केला आहे.

निवेदनावर बँक व्यवस्थापनाने तात्काळ कार्यवाही करून बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी ऐतिहासीक शहराच्या नावाचा मान राखला. बँकेने शहराच्या नामोल्लेख बदलून ‘तळेगाव दाभाडे’ असा केला आहे. यानिमीत्त आमदार श्री सुनील अण्णा शेळके युवा मंचच्या वतीने शाखा व्यवस्थापकांचा मावळी थाटात सत्कार करण्यात आला.

तसेच पेढे वाटून आभार मान्यात आले. यावेळी नगरसेवक रोहित लांघे, युवा मंचचे सभासद गोकुळ किरवे, गणेश शेडगे, सुजित सातकर, अमोल सुतार, प्रतिकेत म्हाळसकर, योगेश मोरे, कुंडलीक राऊत, अक्षय भोकरे, आकाश पवार, अक्षय अवघडे आदी उपस्थित होते.

आमदार श्री सुनील अण्णा शेळके युवा मंच, तळेगाव दाभाडे विभागाच्या वतीने 31 जानेवारी 2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, तळेगाव दाभाडे शाखेला लेखी निवेदन दिले. युनियन बँकेच्या तळेगाव शाखेतून होत असलेल्या व्यवहारीक पत्रव्यवहारातील चेकबुक, पासबुक, बँक स्टेट्मेंट व विविध कागदपत्रांवर ‘तलेगाव दबाडे’ असा उल्लेख होत आहे. तो ‘तळेगाव दाभाडे’ असा दुरुस्त करण्यात यावा. असे निवेदनात सुचविण्यात आले होते.

भारताच्या इतिहासात पहिल्या महिला सरसेनापती म्हणून सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांनी कारकीर्द गाजविली आहे. हा ऐतिहासिक वारसा तळेगाव दाभाडे शहराला लाभलेला आहे. श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नंतर सरसेनापती उमाबाई साहेबांनी स्वराज्याची लष्करी धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि या इतिहासाचे प्रतिक म्हणजे संपूर्ण गाव तळेगाव दाभाडे म्हणून नामकरण होऊन प्रसिद्ध झाले. तरीही या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण कायमस्वरूपी रहावे यासाठी आपण इतिहासाच्या या दुरुस्तीसाठी मुदतीत बदल करणे अपेक्षित असल्याचेही निवेदनात म्हटले होते.

पुढील एक महिन्यात हा बदल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदार श्री सुनील अण्णा शेळके युवा मंचचे गोकुळ किरवे, दिनेश दरेकर, सागर खोल्लम, प्रतिकेत म्हाळसकर, आकाश ठोंबरे, योगेश मोरे, नबिलाल आत्तार, अक्षय भोकरे, योगेश जांभूळकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.