Talwade Rape Case : ’सेल्फी फोटो’ नव-याला दाखविण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – विवाहितेसोबत एकत्रितपणे काढलेला ’सेल्फी फोटो’ नव-याला पाठविण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा उघडकीस आला. हा प्रकार 8 मे 2017 पासून आजपर्यंत तळवडे व वाल्हेकरवाडी (Talwade Rape Case) येथे घडला. आरोपीने विवाहितेकडून वेळेळी पैसेही घेऊन ते परत केलेले नाहीत.

MSEDCL : महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना; ४७ एजन्सीज बडतर्फ

पीडित महिलेने या प्रकरणी गुरुवारी (दि.16) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सलीमुद्दील अलीमुद्दील खान (वय 32, रा. बबनान, जिल्हा बस्ती, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विवाहिता लग्नासाठी उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी गेली होती. त्यावेळी आरोपी आणि त्यांची ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने विवाहितेकडून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच मोबाईलमध्ये एक सेल्फी फोटो काढला. हा फोटो तुझ्या नव-याला पाठवितो, असे धमकावत आरोपीने 2019 मध्ये फिर्यादी यांना तळवडे येथील एका लॉजवर नेऊन (Talwade Rape Case) बलात्कार केला. तेथे त्यांचा अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.