Tamhini Ghat : ताम्हिणी घाट दुर्गम भागातील वंचितांची दिवाळी भूगोल फाउंडेशनने केली गोड

एमपीसी न्यूज : भूगोल फाउंडेशन, संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी (Tamhini Ghat) म्हणून रविवार दि 23 ऑक्टोबर 2022 रोजी मुळशी तालुक्यातील माले गावा अंतर्गत येणाऱ्या (ताम्हिणी घाट परिसरातील) डोंगर दऱ्यातील दुर्गम भागातील आदिवासी व मागासलेल्या भागातील माले – हिवाळी वस्ती, आखाडे वस्ती, गोरे वस्ती, कातकरी वस्ती या ठिकाणी दिवाळीचा फराळ, नवीन साड्या व कपडे वाटप करण्यात आले.

Tamhini Ghat

Bhushi Dam : भुशी धरणात बुडून एकाचा मृत्यू

हा कार्यक्रम माले गावचे सरपंच सुहास शेंडे, मा.ग्रा. सदस्य चंद्रकांत घारे, व निलेश जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक रहिवाशी महिला व पुरूष, लहान मुले-मुली या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान- (माले) मुळशी च्या कार्यकर्त्यांनी केले होते. सुरुवातीला ग्रामस्थांनी भूगोल फाउंडेशनच्या सदस्यांचे स्वागत केले, सरपंच सुहास शेंडे यांनी गाव व वस्त्यांसाठी शासन मदतीने केलेल्या विविध कामांची माहिती दिली.

यावेळी भूगोल फाउंडेशनचे सदस्य श्री अनिल घाडगे व सौ शोभाताई फटांगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर अध्यक्ष श्री विठ्ठल झुंबरशेठ वाळुंज पा. यांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच आपणही समाजाचे काही न काही देणे लागतो म्हणून गोर गरीब गरजुंना दिवाळीमध्ये फराळ व कपडे वाटप करून त्यांचे बरोबर आनंद साजरा करत आहोत.आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलून एकमेकांना हात देऊन एक चांगले काम केल्याने आनंद मिळतो. तसेच भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण,गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जनजागरण, जनप्रबोधन, प्लास्टिकमुक्ती व समाजप्रबोधनपर माहिती आणि संदेश याची माहिती देऊन आपली वनसंपदा जतन करण्याचे (Tamhini Ghat)आवाहन केले.

Today’s Horoscope 27 October 2022 : आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2022

भूगोल फाउंडेशन चे कार्यकर्ते 3 ते 4 किलोमीटर मदत साहित्य डोक्यावर घेऊन डोंगर दऱ्या मधील वस्तीवर गेले व तेथील वाडीवस्तीवरील स्रियांना साडी व दिवाळीच्या फराळाचे किट देऊन एक माणुसकीचा व मदतीचा हात देण्यात आला. यावेळी मुलांना फराळ वाटप करताना या गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आपण केलेल्या मदतीची एक पावती मिळाल्याचे समाधान मिळाले.

नंतर आखाडे वस्ती येथे बहावा,जांभुळ, तामण, कडूनिंब अशा देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. आपण केलेली मदत वंचितापर्यंत पोहचविली व यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम करण्यास अजुन ऊर्जा मिळाली. यंदाची दिवाळी खास अनाथ आश्रम किंवा गावखेड्यात गरजूपर्यंत चला देऊया.

यापुढेही असाच मदतीचा हात एकमेकांना देऊया. यावेळी भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल झुंबरशेठ वाळुंज, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते,अनिल घाडगे, सुनील काटकर, सुनील बांगर, एकनाथ फटांगडे, विशाल शेवाळे, अजिंक्य पोटे, सुदर्शन फटांगडे,विराज बांगर, पियुष फटांगडे, तसेच महिला सदस्या सौ शोभाताई फटांगडे, सौ रोहिणी वाळुंज, कु सेजल वाळुंज, कु.अपूर्वा वाळुंज, या उपक्रमात सहभागी झाले.या कार्यक्रमासाठी उद्योजक उमाकांत पवार, अनिल जगताप,जयसिंग कोहिनकर,विशाल गडदे,उद्योजक नवनाथ कोलते,कर्नल तानाजी अरबुज,उद्योजक शिवराम काळे सुहास चव्हाण मनोज माकोडे,अनिल पोवार, ज्योती दरंदळे,विजयसिंह राजपुत, राजेंद्र ठाकूर, संध्या बाळु पाटील, सतीश पावसे,शिला इचके, मनोज साबळे, अनिल पिंपळे,बाबुलाल चैाधरी सचिन घेणंद,संजय रसाळ व भंडारी कलेक्शन यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य झाले.

तसेच माले गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जोरी, रा. स. प चे तालुका अध्यक्ष बाळा आखाडे, प्रतिष्ठानचे सचिव अंकुश गोरे, सा. कार्यकर्ते लक्ष्मण ढेबे, धोंडीबा आखाडे, बबन मरगळे, भाऊ आखाडे, बबन ढेबे, बबन गोरे व अनेक महिला, मुलेमुली उपस्थित होते. या कार्यक्रमा अंतर्गत एकूण ७८ कुटुंबांना लाभ मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप ढेबे यांनी केले प्रास्ताविक सुनिल आखाडे यांनी केले. कार्तिक गोरे यांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.