Bhushi Dam : भुशी धरणात बुडून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : लोणावळ्याजवळील भुशी धरणात बुडून (Bhushi Dam) काल (26 ऑक्टोबर) एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दिवाळी पाडवा व भाऊबिजेच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रोहन जोगिंदर लाहोट (वय 17, रा. घाटकोपर, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. भुशी धरण परिसरात तो क्लासमधील मित्र व शिक्षक यांच्यासोबत फिरायला आला असताना धरणाच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच सणासुदीच्या दिवशी देखील (Bhushi Dam) लोणावळ्यात शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी जात रेस्कू ऑपरेशन राबवत सदर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सचिन गायकवाड सर, योगेश उंबरे, अशोक उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडु, अजय मयेकर, अमोल परचंड, अमोल सुतार, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने हे रेस्कू राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस नाईक शिंदे करत आहेत.

Today’s Horoscope 27 October 2022 : आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2022

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.