Tata Motors : टाटाचे ग्रामीण भागासाठी ‘अनुभव’ मोबाईल शोरूम ; कार खरेदी, एक्सचेंज ते कर्जाची सुविधा

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या वतीने ग्रामीण भागासाठी ‘अनुभव’ ही मोबाईल शोरूम सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांना कंपनीच्या कार खरेदी पासून ते एक्सचेंज आणि विविध कर्ज योजनेबाबत डोअरस्टेप सुविधा पुरवल्या जातील. नुकतेच या फिरत्या शोरूमचे कंपनीकडून लॉन्चिंग करण्यात आले.

ग्रामीण भागात टाटा मोटर्सचा रिच वाढवा म्हणून ग्रामीण मार्केटिंग योजनेअंतर्गत ‘अनुभव’ या फिरत्या शोरूमची संकल्पना राबविली जात आहे. देशभरात 103 फिरते मोबाईल शोरूम लॉन्च करण्यात आली आहेत. टाटाच्या विविध डीलर्सना ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी कंपनीच्या नवीन वाहनांची माहिती, अॅक्सेसरिज, आर्थिक सहाय्य, टेस्ट ड्राईव्ह आणि एक्सचेंज याबाबत माहिती पुरविण्यासाठी फायदेशीर ठरेल.

अनुभव या फिरत्या शोरूमसाठी टाटा मोटर्सच्या टाटा इन्ट्रा वी10 या गाडीचा वापर करण्यात आला आहे. या गाडीला आकर्षकपणे डिझाईन करण्यात आले आहे. विविध भागातील डिलर्स यांच्या मार्गदर्शन आणि निरिक्षणाखाली शोरूमचा वावर असेल. प्रत्येक महिन्याला विशिष्ट तालुक्यातील विविध मार्गांचे नियोजन देखील डिलर्स कडून केले जाईल. गाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर असणार आहे त्यामुळे त्यांचा मार्ग, अंतर आणि युटिलायझेशन याची माहिती मिळत राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.