Tata Buisness News : पश्चिम भागात नेक्सॉन ईव्ही पहिल्या पसंतीची कार, 74 टक्के शेअरसह बाजारपेठेत अग्रस्थानी

पश्चिम भारतातील 74 टक्‍के बाजारपेठ हिस्‍स्यासह ईव्‍ही बाजारपेठेत अग्रस्‍थानी

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन ईव्ही या इलेक्ट्रिक कारला देशात मोठी पसंती मिळत आहे. भारतातील पश्चिम भागात कारला विक्रमी मागणी मिळत असून, पश्चिम भागातील 74 टक्के बाजारपेठेत नेक्सॉन अग्रस्थानी आहे. कारला महाराष्‍ट्र, गुजरात,गोवा व मध्यप्रदेशमधील 10 शहारांत या कारला अधिक मागणी आहे.

जानेवारी 2020 मध्ये कार लॉन्च केल्यापासून कंपनीने पश्चिम भारतात 300 टक्क्याहूंन अधिक वाढीची नोंद केली तर, 74 टक्के वायटीडी बाजारपेठेचा हिस्सा प्राप्त केला आहे. इलेक्ट्रिक एसयुव्ही कारची डिझाईंन, कार्यक्षमता, तंत्रज्ञान, सुलभता आणि कमी मेन्टेनन्स याबाबत ग्राहक समाधान व्यक्त करत असतात.

सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत असल्याने नागरिक या वाहनांना पसंती देत आहेत.

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वेईकल बिझनेस युनिटचे विक्री, विपणन व ग्राहक सेवा विभागाचे प्रमुख रमेश दोरायराजन म्हणाले, टाटा नेक्सॉन ईव्ही या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आमच्यासाठी फारच गेम चेंजिंग राहिले.

मागील वर्षी कार बाजारात आल्यापासून ग्राहक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून कारचे कौतुक होत आहे. कनेक्टेड ड्राईव्ह, झिरो इमिशन आणि किफायतशीर किंमत यामुळे नेक्सॉन ईव्ही देशात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम भारतात टाटाची 24 विक्री सेंटर आणि 29 अधिकृत सर्विस सेंटर आहेत. प्रत्येक कार सोबत मोफत घरगुती चार्चिंग किट मिळते तसेच शहरांमध्ये 46 फास्ट चार्चिंग स्टेशन उपलब्ध आहेत. त्यापैकी काही स्टेशन मुंबई-पुणे, पुणे-नाशिक, पुणे-औरंगाबाद, पुणे- कोल्हापूर, सुरत-अहमदाबाद आणि अहमदाबाद-राजकोट या पश्चिमी महामार्गावर आहेत.

एका चार्चिंगमध्ये झिरो इमिशन सह लांबचा पल्ला हि कार गाठू शकते. लॉकडाऊननंतर देखील कारच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. इव्ही वापराला चालना देण्यासाठी टाटा मोटर्सने ‘टाटा युनिव्हर्स ‘ देखील सादर केली आहे.

यामध्ये चार्चिंग सोल्यूशन, नाविण्यपूर्ण रिटेल अनुभव आणि सुलभ आर्थिक पर्याय यांचा समावेश आहे. उत्पादनाबाबत अधिक माहितीसाठी https://nexonev.tatamotors.com या संकेस्थाला भेट देण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.