BNR-HDR-TOP-Mobile

Tathwade: भाजपचे शेखर ओव्हाळ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केली घरवापसी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भाजपमध्ये असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शेखर ओहाळ यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ओव्हाळ यांनी घरवापसी केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, माजी उपमहापौर राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, निलेश डोके उपस्थित होते.

चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे शेखर ओव्हाळ कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शेखर ओव्हाळ यांच्या घरवापसीमुळे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे व मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांना फायदा होईल. शेखर ओव्हाळ यांचे रावेत, पुनावळे परिसरात चांगले वर्चस्व आहे.

दरम्यान, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घरवापसी केली आहे.

HB_POST_END_FTR-A4

.