Thargaon News : थेरगावात व्यापारी असोसिएशनकाडून लाॅकडाऊनचा निषेध

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लॉकडाउनच थेरगाव सोळा नंबर येथील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला. यावेळी व्यापाऱ्यांनी हातात फलक घेऊन दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

युवा मोर्चा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष राजेश राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी व्यापारी रमेश राठोड, हेमाराम कुमावत, ओमपरकाश कुमावत, गोविंदसिंग राजपुरोहित, भगवान बोराना, रानु राजपुरोहित, गणेश अमृतकर व अन्य व्यापारी आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दि. 7 एप्रिल ते दि. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. याला पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. शहरातील विविध भागात व्यापाऱ्यांकडून या लॉकडाऊनला कडाडून विरोध केला जात आहे.

तसेच लाॅकडाऊन विरोधात निदर्शने व आंदोलन केले जात आहे. थेरगावात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हातात घेतलेल्या अनेक फलकांनी सरकारचा निषेध केलेला आढळला व आम्हाला कसेही करुन व्यवहार व व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.