Chinchwad : मोक्क्यातील फरार आरोपीला अटक

चिंचवड पोलिसांची कामगिरी; पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – मोक्क्यातील आणखी एका फरार आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी मोक्कातील फरार आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली होती. त्याच्याच एका साथीदाराच्या चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या चोरांकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अविनाश उर्फ तोत्या पांढरकर (वय 20, रा. पांढरकर चाळ, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश याला चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने आकुर्डी येथून अटक केली. या आरोपीवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो मागील एक वर्षांपासून फरार आहे. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायदा कलम 307 नुसार एक, 326 नुसार एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो फरार होता. या कारवाईमुळे पाच गुन्हांची उकल झाली आहे.

चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने यापूर्वी विकी उर्फ विकास अंकुश भिसे (रा. दळवी नगर), पितम आवतारे (रा. थेरगाव), राजू उर्फ राजकुमार हिरवे (रा. दळवी नगर, चिंचवड) या तीन आरोपींना अटक केली असून अविनाश हा त्यांचा चौथा साथीदार आहे. यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक राजेंद्र शिरसाठ, स्वप्निल शेलार, रूषिकेश पाटील, पोलीस शिपाई गोविंद डोके, राहूल मिसाळ, अमोल माने, पंकज भदाने, महिला पोलीस नाईक वंदना गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.