Gahunje news: पवना नदीच्या पुलावरुन सेल्फी कढताना मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : पवना नदीच्या पुलावरुन सेल्फी कढताना मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे, अशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी दिली आहे.
मयताचे नाव इकतार अहमद असून त्याचे वय २५ वर्ष होते. चिंचवड मधील वाल्हेकरवाडी चिंचवडे नगर पुणे येथील तो रहीवासी होता.

काल १५ ऑक्टोबर रोजी शिरगाव साळुंब्रेला जोडणारा पवना नदीवरील पुलावरुन सेल्फी कढताना एकाचा बुडून मृत्यू झाला होता. अशी माहिती ॲड. सारीका आगळे, गहुंजे पोलीस पाटील आणि आरती अतुल बंडलकर, साळुंब्रे पोलीस पाटील यांनी काल संध्याकाळी 5 वा दिली होती. त्यामुळे लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे व आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यू टीम चे पथक घटनास्थळी पोहोचले.
शिरगांव पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील आले होते.तळेगाव दाभाडे नगरपालिका आणि तळेगाव दाभाडे एमआयडीसी चे अग्निशमन विभागाचे कर्मचारी सुद्धा तेथे पोहोचले होते. सर्वांनी नदीत शोध घेतला पण मृतदेह काही सापडला नाही. अंधार झाल्यामुळे शोध रात्री 7 वा. थांबवण्यात आला होता. आज सकाळी पुन्हा सर्व जन घटनास्थळी मृतदेह शोधगण्यासाठी गेले होते. सकाळी 11 वा. चे सुमारास मृतदेह नदीच्या मदोमध मिळाला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे, आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यू टीमचे अध्यक्ष गणेश निसाळ, विनय सावंत, सत्यम सावंत, निनाद काकडे, शुभम काकडे, भास्कर माळी, तुशार सातकर, ओमकार भेगडे, बाबु चव्हाण ,अनिश गराडे, राणी ऍम्ब्युलन्स चे
अजय मुर्हे, शिरगाव पोलीस स्टेशन परंदवाडी चे पिलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस नाईक महादेव कवडे, हिरामन आगळे व ईतर ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.