Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता

The entire State, including Goa, is likely to remain dry.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे कोरडे होते.
मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे . राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे 14.2″ से. नोंदवले गेले.

पुढील हवामानाचा अंदाज:

02-05 नोव्हेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा:

01 नोव्हेंबर – 05 नोव्हेंबर: काही नाही

पुण्यात व मुंबईतही आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.