Chinchwad : रस्त्याने जाणा-या शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या शिक्षिकेचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडली.

जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या मुलीला क्लासला सोडून घरी येत होत्या. त्या लिंक रोडवरील पंचरत्न अपार्टमेंट श्रीधरनगर येथे आल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like