Talegaon : घरफोडी करून दीड तोळे सोन्याची चोरी

एमपीसी न्यूज – घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 7) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे, परंदवाडी येथे घडली.

निलेश बाबुराव बंडे (वय 30, रा. सोमाटणे, परंदवाडी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी निलेश यांचे घर कडीकोयंडा लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात ठेवलेले 14.5 ग्रॅम वजानाचे 68 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.