Wakad : क्रेडिट कार्डवरून ऑनलाइन डेबिट करून सव्वातीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्डवरून ऑनलाइन डेबिट करून तीन लाख 30 हजार 81 रुपयांची फसवणूक केली. वाकड येथे 4 जानेवारी 2020 रोजी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

मीनू श्रजेश चौरसिया (वय 34, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे क्रेडीट कार्ड असून, त्यावरून अज्ञात आरोपीने तीन लाख 80 हजार 81 रुपये फिर्यादी यांच्या पतीच्या संमतीशिवाय डेबिट करून फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.