Pune News : कात्रज येथील तलावाची दयनीय अवस्था

एमपीसी न्यूज – नागरिकांचे आकर्षण ठरावे म्हणून पुणे महापालिकेच्या वतीने  पेशवे कालीन कात्रज तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर केवळ राष्ट्रीय सणांना हा तलाव साफ होतो.एरवी या तलावात कचरा तरंगताणा दिसतो. त्यामुळे तलावाची अशी दयनीय अवस्था पाहून ऩागरिकांनी पुणे महापालिकेकडे तक्रार देखील केलेली आहे.

 

 

या तलावातून पेशवे यांनी पुण्याला पाणी उपलब्ध करण्यासाठी कात्रज ते शनिवार वाडा पर्यंत जगप्रसिद्ध भुयारी मार्गाने पाणी नेण्यात आले होते. मात्र याच तलावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जुन्या प्रभाग रचनेनुसार क्रमांक 40 चा हा भाग स्थानिक नगरसेवकांनी व प्रशासनाच्या हलगर्जीपणाने ही अवस्था झाल्याने स्थनी नागरीक अशिष भोसले यांनी तक्रार केली आहे.

 

Pimpri News : महापालिका आयुक्तांविरोधात राज्य माहिती आयोगाकडे तक्रार

 

 

पावसाळा असल्याने तलावात पाणीसाठा भरपूर आहे पण त्यावर कचरा तरंगताना दिसत आहे. त्यामुळे तेथे डासांचे साम्राज्य पसरू शकते. साथीचे रोग पसरले तर त्याला कोण जबाबदार असणार आहे ? तलाव हा केवळ 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला स्वच्छ होतो. स्वातंत्र्यदिन तोंडावर आला असताना आता तरी महापालिकेला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.