Pimpari News : युवकांना शिवविचाराशी जोडण्याचे खरे श्रेय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच – इरफान सय्यद

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... 

एमपीसी न्यूज :- एकजुटीने रहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा; तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल. असा विचार मराठी जनमानसात रुजवून मराठी माणसाच्या कल्याणसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले.

मराठी भाषा, अस्मिता आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी तहहयात हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित ठेवली. आपल्या प्रभावी वृकृत्वाने आणि ज्वलंत विचारांनी मराठी मनाला भुरळ घालून अन्यायाविरूध्द लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना करीत मराठी युवकांना प्रेरित केले. त्यांना शिव विचाराशी जोडण्याचे श्रेय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जाते.  त्यांच्या या कार्याला मनाचा मुजरा, असे प्रतिपादन इरफान सय्यद यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटना आणि महाराष्ट्र राज्य कामगार सल्लागार समिती सदस्य, कामगार नेते इरफान सय्यद यांनी  रविवारी (दि. २३) रोजी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना अभिवादन केले. जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांच्या ९७ पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, जेष्ठ शिवसैनिक अनिल दुराफे, संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ गोडेकर, प्रमोदमामा शेलार, संतोषभाऊ सालुंखे, संघटनेचे जन.सेक्रेटरी प्रवीण जाधव, सर्जेराव कचरे, संघटक आबा मांढरे, समर्थ नाइकवडे, अरुण जोगदंड,  चंदन वाघमारे, अमित पासलकर, संघटनेचे सभासद तथा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.