IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून, मुंबई-चेन्नई आमने-सामने

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत वाढता संसर्ग पाहता 2021 चे आयपीएल रद्द करण्यात आले होते. उर्वरित सामन्यांचे स्थळ युएई याठिकाणी हलवण्यात आले. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे दुसरे सत्र आजपासून (दि.19) सुरू होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांच्या कामगिरी उत्तम आहे. चेन्नई 10 पॉईंट्ससह दुसऱ्या तर, मुंबई इंडियन्स 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल ही टीम 8 पैकी 6 सामने जिंकत 12 पॉईंट्ससह टॉपवर आहे. पहिल्या सत्रात मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई विजयी झाला होता. पहिला दोन्ही संघांच्या नावे 1-1 विजय आहे.
मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत, यापैकी 19 सामन्यात मुंबईचा तर 12 मध्ये चेन्नईचा विजय झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रात एम एस धोनी आणि रोहित शर्मा दोघांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे. दोन्ही संघाचे प्लेईंग एलेव्हन अद्याप जाहीर झाले नाहीत. यामध्ये चेन्नईचा संघ जवळपास निश्चित असून मुंबई संघात थोडा बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना आज (रविवारी) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, सात वाजता नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टार वरती हा सामना पाहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.