BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : मिठाईचे दुकान फोडले

एमपीसी न्यूज – मिठाई दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 1 लाख 15 हजाराची रोकड लांबवली. ही घटना चिखली येथे घडली.

जगदीश हंसारामजी चौधरी (वय 47, रा. लक्ष्मी सोसायटी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांचे सुदर्शननगर येथे जगदंबा स्वीट मार्ट या नावाने मिठाई दुकान आहे.

18 जुलै रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील कॅश काऊंटरच्या ड्रॉवरचे लॉक तोडून 1 लाख 15 हजार रूपयांची रोकड लांबवली. फौजदार बागुल तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3