Nigdi : पत्‍नीने चाकूचा धाक दाखवून पतीला लुटले

एमपीसी न्यूज – पत्‍नीने-पतीला चाकूचा धाक दाखवून कपाटातील 55 हजार आणि दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी साडेआठच्या सुमारास निगडी येथे घडली.

सचिन प्रभाकर चव्हाण (वय 40, रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची पत्नी सोनिया सचिन चव्हाण आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि सोनिया हे कौटुंबिक कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त राहतात. शनिवारी सकाळी सोनिया हातात चाकू घेऊन घरात घुसली. तिने सचिन यांना चाकूचा धाक दाखवून कपाटात ठेवलेली 55 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी देखील घेऊन गेली. यावरून सचिन यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.