Pune : लोकांना आज चांगले नेतृत्व दिसत नाही, त्यामुळे जनतेत अस्वस्थता – शरद पवार

एमपीसी न्यूज – लोकांना आज चांगले पर्याय, चांगले नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे जनतेत अस्वस्थता आहे. नोटबंदीचा निर्णय घ्यायचा अधिकार पंतप्रधानांना नाही. मात्र तरीही अशा प्रकारचा निर्णय मोदींनी घेतला. यामुळे नक्षलवाद आणि दहशतवाद संपेल अशी दिशाभूल करण्यात आली, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजय आवटे यांच्या ‘वी द चेंज आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खासदार शरद पवार खासदार राजू शेट्टी खासदार राजीव सातव, आमदार कपिल पाटील, डॉक्टर रझिया पटेल हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर यशवंत मनोहर हे होते

राज्यात शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. मात्र, सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.