Thergaon : लोखंडी कोयत्यासह तडीपार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने (Thergaon) थेरगाव येथून बुधवारी (दि.26) एकाला अटक केले आहे. अटक आरोपी हा तडीपार असून त्याच्याजवळ पोलिसांनी एक कोयता देखील जप्त केला आहे.

आकाश रंगनाथ चव्हाण (वय 26 रा. वाकड ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 15 सप्टेंबर 2022 रोजी एक वर्षाकरिता पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीचा आदेश असताना देखील आरोपी हा थेरगाव परिसरात असल्याचे पोलिसांना खबर मिळाली.

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वयीत करा; आमदार महेश लांडगे यांची मागणी

पोलिसांनी घटनास्थळी जात त्याला अटक केली असता त्याच्याकडे एक (Thergaon) लोखंडी कोयता ही मिळून आला. यावरून पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.