Thergaon news: युवासेनेच्या वतीने गरजूंना  धान्य किट वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर  युवासेनेच्या वतीने थेरगाव, वाकड रोड परिसरातील गरजूंना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शिवकॉलनी, वाकडरोड, थेरगांव परिसरातील  गरजूंना आज (सोमवारी)  अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.  याप्रसंगी चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदू सुतार, विजय पाटील, शिवसेना महिला पदाधिकारी पुष्पा तारू, नूरजहाँ शेख, युवासेना पदाधिकारी संग्राम धायरीकर, जयेश केदारी, विक्रम झेंडे, आकाश जाधव, योगेश ननावरे आदी  उपस्थित होते.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध निर्बंध लादले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे युवा सेनेच्या वतीने शिवकॉलनी,वाकडरोड,थेरगांव परिसरातील गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप केले. त्यात गव्हाचे पीठ, तेल, डाळ, मसाला, तांदळाचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.