-MPC-TOP-MOST-BANNER-I

Moshi: घराबाहेरील शूजमध्ये चावी ठेवणे पडले महाग, लाखाचे लॅपटाॅप लुटले

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – घराबाहेरील शूजमध्ये ठेवलेल्या चावीने घर उघडून घरातील 27 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मोशी येथे घडली. यासंदर्भात कल्पेश विजय भगत (वय-26, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कल्पेश यांनी घर बंद करून घराची चावी दरवाज्यासमोरील शूजमध्ये ठेवली होती. अज्ञात चोरट्याने त्यांना चावी ठेवताना पाहिले. त्यानंतर चोरट्याने शुजमधील चावी घेऊन घराचे कुलूप उघडले. अ‍ॅसुस, एचपी आणि लेनोवो या तीन कंपन्यांचे  27 हजार रुपयांचे तीन लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. शिंदे तपास करत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn