Third Wave : संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलांना संसर्गाची शक्यता कमी ; एम्स-डब्ल्यूएचओचा सीरो सर्व्हे

एमपीसी न्यूज – संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलांना संसगाची शक्यता कमी आहे. असे जागतिक आरोग्य संघटना आणि नवी दिल्ली एम्सनं मिळून एक सीरो प्रिवलेंस सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सने पाच राज्यांमध्ये सर्व्हे केला आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सिरोप्रिव्हेलेन्स दिसून आला आहे. म्हणजे या मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज आहेत, त्यामुळे मुलांना तिसऱ्या लाटेपासून संरक्षण मिळू शकेल, असं या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

एम्सचे कम्युनिटी मेडिसीनचे संशोधन प्रमुख डॉ. पुनीत मिश्रा यांच्या नेतृत्वात हा सर्व्हे दिल्ली, बल्लगढ (फरीदाबाद), गोरखपूर, भुवनेश्वर आणि अगरतळा या पाच ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आला. या ठिकाणी केलेल्या सर्व्हेदरम्यान 4509 लोकांना स्टडीमध्ये सहभागी करण्यात आलं. यातील 2811 सीरो पॉझिटिव्ह आढळून आले. म्हणजेच 62.3 टक्के इतका सीरो पॉझिटीव्हीटी दर असल्याचं या अभ्यासात समोर आलं आहे.

दक्षिण दिल्लीच्या शहरी क्षेत्रात रिसेटलेमेंट कॉलनी जिथं दुसऱ्या लाटेच्या आधीही 74.7% सीरो प्रभाव होता. दक्षिण दिल्ली मधील 0-18 वयोगटातील (शाळेत जाणारे विद्यार्थी) 73.9% सीरो प्रिवलेंस आढळून आला. दिल्ली आणि एनसीआर विशेषता फरीदाबाद या परिसरात दुसरी लाटेनंतर अधिक सीरो प्रिवलेंस होऊ शकतो. शक्यता अशी आहे की, सीरो प्रिवलेंसचे स्तर ‘तिसरी लाटे’ विरोधात सुरक्षात्मक असू शकतात असे या सर्व्हेतून निरीक्षण नोंदवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.