Maharashtra News : विकेंड लॉकडाऊनमध्येही चिकन, मटण आणि आंबे मिळणार!

0

एमपीसी न्यूज : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ करुन 14 मे पर्यंत लागू केला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उच्चाधिकार समितीच्या मंत्र्यांनी घोषणा केली आहे.

या 15 दिवसांत आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये कोणती आणि अत्यवश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार आहेत. यामध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार आहे याबाबत तुमच्या मनात प्रश्न पडत असतील तर त्यांची उत्तरे जाणून घ्या, राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांची दुकाने, आंबे विकणारे दुकान सकाळी अकरापर्यंत चालू ठेवली जाऊ शकतात का? याबाबत माहिती करुन घ्या.

प्रश्न-1. राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांची दुकाने शनिवारी व रविवारी (वीकेंडला) उघडी ठेवता येतील का? यासंबंधीच्या मालवाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत का?

_MPC_DIR_MPU_II

– होय. चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्याची दुकाने आठवड्याच्या सातही दिवस उघडी राहू शकतात. नागरिकांसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत उघडे राहू शकतात व त्यानंतर ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमाने होम डिलिव्हरी करता येईल. या कालावधीनंतर जर कोणीही ही सेवा देताना आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. चिकन, मटण, कोंबड्यांच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

2. आंबे विकणारी दुकाने सकाळी अकरापर्यंत चालू ठेवली जाऊ शकतात का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि वर्गीकरण, पिकवण्याचे काम करता येईल का?

– ग्राहकांना आंबे विक्रीचा काम सकाळी 7 ते 11 पर्यंत करता येईल. ग्राहकांना त्यानंतर सेवा देताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु श्रेणीकरण, वर्गीकरण व पिकवण्याचे काम यानंतरही चालू ठेवता येईल. सदर आदेशान्वये 11 वाजल्यानंतर होम डिलिव्हरी करता येईल किंवा स्थानीय आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिलेले आदेशांचे पालन करून सदर काम करता येईल. याच्या माल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment