Maval : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुरुवारी कार्यशाळा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रातील बूथ अध्यक्ष, सचिव व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष काम करण्याबाबतची प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 1:00 वाजता पूजा गार्डन कार्यालय वडगाव मावळ येथे आयोजित केलेली आहे.

ही कार्यशाळा युवा नेते पार्थ पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा भोसले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक सुहास उभे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, हवेली तालुका सभापती हेमलता काळोखे, ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष सुभाष जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी 354 मतदान केंद्रांमधील सर्व बुथ अध्यक्ष व सचिव आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.