Today’s Horoscope 28 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

28.01.2023.

शुभाशुभ विचार – 09 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- रथसप्तमी.

राहू काळ – सकाळी 9.00 ते  10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र-19.06 पर्यंत अश्विनी नंतर भरणी.

चंद्र राशी – मेष.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. बरेच दिवसापासून गहाळ झालेली एखादी वस्तू आज अचानक सापडेल. आपल्या आवडत्या छंदास आज तुम्ही वेळ द्याल.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )

दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करायला हवा. आज कंजूषणाचा काही उपयोग नाही. तातडीने दूरच्या प्रवासास निघावे लागेल. आपल्या मौल्यवान वस्तूची खूप काळजी घ्या.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आज दिवस लाभाचा असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ संभवतो. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

कर्क (शुभ रंग- क्रीम )

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. नोकरीत साहेब जितका विचारतील तितकाच बोला. लवकर घर गाठा.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

दूरच्या प्रवासात झालेल्या काही नव्या ओळखी पुढील काळात व्यवसायात बुद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. ज्येष्ठ मंडळी आज तीर्थयात्रेचे बेत आखतील.

कन्या ( शुभ रंग- लाल )

आज महत्त्वाच्या कामात थोडेफार अडथळे येतील. आपल्या आवाक्या बाहेरच्या जबाबदाऱ्या न स्वीकारलेल्या बऱ्या. मोठ्या रकमेची ने आण करताना आज सावध राहायला हवे.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

उद्योग धंद्याच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घेण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा )

नोकरदारांना आज आधिकारी वर्गांकडून चांगली वागणूक मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांना फळ मिळे कामाच्या व्यापात तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

धनु- (शुभ रंग- हिरवा )

उच्चशिक्षितांच्या महत्त्वकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील. नवविवाहित मंडळींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )

बरेच दिवसांपासून दुर्लक्षित झालेल्या घरगुती कामांकडे आज तुम्हाला लक्ष द्यावेसे वाटेल. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

कुंभ (शुभ रंग – मोरपिशी )

रिकामटेकड्या गप्पांमध्ये आज तुमचा बराचसा वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. तुमची काही गुपिते आज उघड होतील. कमी बोलून आज कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मीन -(शुभ रंग – लाल )

आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. गृहिणी अनपेक्षित पणे येणाऱ्या पाहुण्यांची उठबस आज हसतमुखाने करतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.