Today’s Horoscope 08 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग-Today’s Horoscope 08February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 08.02.2024.

शुभाशुभ विचार – त्रयोदशी वर्ज्य दिवस.

आज विशेष – शिवरात्री.

राहू काळ – दुपारी 01.30 ते3.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – उत्तराशाढा .

चंद्र राशी – धनु 10.04 पर्यंत नंतर मकर.
—————————–
मेष – ( शुभ रंग – आकाशी)
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणे योग्य ठरेल. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे. किरकोळ तब्येतीच्या तक्रारी ही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

वृषभ ( शुभ रंग- निळा)
सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. आज वडीलधाऱ्यांना दुखावू नका.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको. नाकासमोर चाला.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
परिवारातील सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

सिंह -( शुभ रंग – पिस्ता)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. आज तुमची तब्येत थोडी नरम असेल.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)
काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही आज मौजमजेला प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार संधीचे सोने करतील.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

धनु (शुभ रंग- भगवा)
उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकांनाही हेवा वाटेल.

मकर (शुभ रंग- सोनेरी)
जिथे जाल तिथे तुम्ही आज आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचे विचार समजून घ्या. कायदा मोडू नका.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
हाती असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो की जो टाळता येणार नाही. काहीजण आज सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

मीन ( शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटना घडतील. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्तच असेल नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आज योग्य दिवस आहे.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.