Alandi : अनेक संतांच्या या पवित्र भूमीमध्ये भक्तीची जी लाट चालली होती ती पुन्हा उठली आहे – श्री श्री रवीशंकर

एमपीसी न्यूज : आळंदी येथे प पू. स्वामी गोविंददेव गिरी (Alandi )महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाला पूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज, प्रसिद्ध कार्यकर्त्या राजश्रीजी बिर्ला आणि इतर मान्यवर संत महात्मे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सरकारचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

समाजातील महिलांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देत प्रोत्साहित करणे यासाठी गीता परिवाराने गीता भक्ती अमृत महोत्सवात आयोजित केलेल्या मातृशक्ती परिषदेने सर्वांमध्ये उत्साहाची लाट पसरली. उत्सवाच्या चौथ्या दिवशी, 7 फेब्रुवारीला झालेल्या या परिषदेत, महिला सक्षमीकरणावर विशेष चर्चा झाली.

पवित्र तीर्थ आळंदीमध्ये गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना प्रथमच 81 हवन कुडीय महायज्ञ अनुभवायला मिळत आहे. दररोज निरनिराळे यजमान समाजकल्याणासाठी या महायज्ञाचे यजमानपद भूषवित आहेत. 2000 हूनही अधिक वैदिकांकडून सतत होणार्‍या पवित्र मंत्र जपातून निर्माण होणारी कंपने हा न भूतो न भविष्यती असा अनुभव आहे.

गीताभक्ती अमृत महोत्सवात उपस्थितांच्या, श्री राम जय राम जय जय राम या जयघोषाने श्रीमद्भागवत कथेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. भाविकांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे केलेल्या जयघोषाने प्रत्येक भक्ताची इच्छा परमात्म्यापर्यंत पोहचत असल्याची अनुभूती आली.

समाजोन्नती आणि सशक्तीकरणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या विविध क्षेत्रांतील बारा आदरणीय महिलांचा सत्कार करताना सर्वांनाच स्वामीजींचा वात्सल्यभाव दिसून आला. त्यांत श्रीमती लताताई भिशीकरजी, भाग्यलता पाटसकरजी, प्रमिला माहेश्वरीजी, इंदुमती काटदरेजी, लीना मेहेंदळेजी, विजया गोडबोलेजी, ललिता मालपाणीजी, लीना रस्तोगीजी, कल्याणी नामजोशीजी, सरोजा भाटेजी, डॉ. मंगला चिंचोरेजी आणि मंदा गंधेजी यांचा समावेश होता. स्वामीजी आणि (Alandi) इतर विशेष पाहुण्यांनी या महिलांचे त्यांच्या निस्वार्थ योगदानाबद्दल कौतुक केले.

परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज म्हणाले, “आज 12 उल्लेखनीय महिलांचा सन्मान करताना, त्यांच्या अमूल्य प्रयत्नांची आणि परिश्रमाची आपण दखल घेऊया. त्यांचे निःस्वार्थ योगदान हे समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज, पूज्य श्री श्री रविशंकर जी महाराज, आदरणीय श्री सुधांशुजी महाराज, आदरणीय श्रीमती राजश्रीजी बिर्ला, आदरणीय साध्वी ऋतंभराजी दीदी मा, आदरणीय श्री चिन्ना जियार स्वामीजी महाराज आणि आदरणीय बाबा श्री सत्यनारायणजी मौर्य यांसारख्या पूज्य अध्यात्मिक गुरुंची आणि विचारवंतांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

पूज्य श्री श्री रविशंकर म्हणाले भारताचे गौरव ,अध्यात्म व सनातन संस्कृतीचे अतिश्रेष्ठ निदर्श संज्ञानी करिता आदर्श वेद विद्याच्या पोषणा करिता गोविंद गिरी महाराजांचे अवतरण झाले आहे.येथे भारताच्या सर्व संत समाजाला एकसूत्रतेत तुम्ही बांधले आहे.सूत्र रुपी ज्ञानी केवळ भगवान श्रीकृष्ण होते.गीतेला आपल्या जीवनात उतरवले.
गीता व वेदशास्त्र यांची जनमाणसात जागृती ज्यांनी केली त्या स्वामींचा हा अमृत उत्सव आहे.

Pune : भाजपतर्फे बूथ चलो अभियान – धीरज घाटे

तो भारताच्या अमृत महोत्सवाशी जोडला गेला आहे.ही दैवी योजना आहे.तुमचे सानिध्य अनेक वेळा प्राप्त झाले.आपल्या मध्ये जी सरळता, सहजता,स्नेह आहे.ते आदर्श संज्ञाशी कसा असावा ते शिकवते.आपले जीवन मधुरतेने भरलेले आहे,ज्यांच्या डोळ्या मध्ये ओलावा आहे.ह्रदयात सर्वांसाठी करुणा आहे.असे आपले व्यक्तित्व आहे.आपला जो उद्देश आहे जनमाणसामध्ये वेद विद्या पोहचवून विद्यार्थी घडवणे. हे पुण्य आहे.

श्रीरामाने आपली निवड केली आहे.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव व अनेक संतांच्या या महाराष्ट्राच्या पवित्र भूमी मध्ये एक लाट चाललेली होती भक्तीची ती पुन्हा उठलेली आहे.नास्तिकतेची नाव वाचणार नाही.भक्तीची अशी लाट उठली आहे.उत्साह भरणाऱ्या माता येथे बसलेल्या आहेत.साध्वी ऋतंभरा यांनी परिश्रम घेतले आहे. त्यांनी माणसा मधील झोपलेली देशभक्ती व धर्मभक्ती जागृतेचे काम केले आहे.जियर स्वामींनी धर्म जागरणेचे काम केले आहे.आंध्र प्रदेशात आपण गावा गावात धर्माचा प्रसार केला. व समतेची मूर्ती स्थापन केली.

भारत माँ की आरतीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा श्री सत्यनारायणजी मौर्य यांच्या आत्मस्फूर्ती (Alandi) देणाऱ्या ‘भारतमाता आरती’ने या दिवसाचा उच्चांक गाठला. आपल्या अनोख्या पद्धतीने, बाबाजींनी अतिशय सुंदरपणे भारताच्या समृद्ध इतिहासाचे दर्शन घडवले, भारतीय असण्याचे खरे मर्म उलगडले. आपल्या विलक्षण कला आणि संगीत सादरीकरणाने, बाबाजींनी सकारात्मक प्रभाव पाडला, ज्ञान वृद्धिंगत केले ​​आणि सर्व उपस्थितांमध्ये अभिमानाची चेतना जागवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.