Pune : भाजपतर्फे बूथ चलो अभियान – धीरज घाटे

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात (Pune) आज भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यकारणीची साप्ताहिक बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडी, मोर्चे, मतदारसंघ, मंडल, बूथ यावरील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून चालू असलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रामुख्याने बूथ चलो अभियान यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

बूथ चलो अभियान कशा प्रकारे प्रभावीपणे राबवता येऊ शकते तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत कशा प्रकारे पोहचवता येतील, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी काही प्रमुख नियुक्ती पण करण्यात आल्या.

Pune : सुहास दिवसे यांची पुण्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदी वर्णी

या बैठकीस प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे, शहर सरचिटणीस रवी साळेगावकर, सरचिटणीस राहुल आप्पा भंडारे, सरचिटणीस महेश पुंडे, सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हर्षदा ताई फरांदे उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.