Today’s Horoscope 09 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 09 December 2022 
वार – शुक्रवार
09.12.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग 14.59 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
—————————————-
मेष – (शुभ रंग- निळा)
स्थावर विषयक मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. आज प्रवासात काही नवी नाती जुळतील. काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत. डोके शांत ठेवणे गरजेचे आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

मिथुन (शुभ रंग- पांढरा)
आज कुठेही आपले तेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही क्षुल्लक गोष्टींवरूनही तुम्हाला राग येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दमटवाल.

कर्क (शुभ रंग- डाळिंबी)
आज अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागेल. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळायला हवी. बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी मिळतील.

सिंह (शुभ रंग- चंदेरी)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील.

कन्या (शुभ रंग- क्रीम)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवलेले बरे.

तूळ (शुभ रंग- भगवा)
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाही. वरिष्ठ आपल्यावर खूषच आहेत अशा समजूतीत राहू नका मनशांतीसाठी आज सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

वृश्चिक (शुभ रंग- लाल)
आज तुम्ही आपल्या मर्यादित राहिलेले बरे, धाडसाची कामे आज शक्यतो टाळलेली बरी. सासुरवडी कडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार चोख असू द्या. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

मकर (शुभ रंग- केशरी)
ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता भासेल विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)
उच्चशिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्याल. छान दिवस.

मीन (शुभ रंग – जांभळा) – Today’s Horoscope 09 December 2022 
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस, कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.
.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.