Today’s Horoscope 12 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 12 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख -12.04.2024.

शुभाशुभ विचार – 13 नंतर चांगला.

आज विशेष – विनायक चतुर्थी.

राहू काळ – दुपारी 10.30  ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष ( शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात आज तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचाही चांगला प्रभाव पडेल. विरोधकांनाही तुमची मते पटवून देऊ शकाल. किरकोळ कारणाने शेजारी रुसून बसतील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज सर्व कामे सुरळीत पार पडतील. तुमचा अहंकार दुखावणारी एखादी घटना घडेल. इतरांशी जुळवून घेणे अवघड जाईल. आज शब्दांचा वापर जरा जपूनच करा.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)

राशीच्या वयातील चंद्र खर्चाचे प्रमाण वाढवेल. पैसा येण्याआधीच तो जाण्याचेही मार्ग तयार असतील. आज प्रवास घडणार आहेत. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

कर्क ( शुभ रंग- तांबडा)

आज राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता करेल. कार्यक्षेत्रात तुम्ही वेळीच घेतलेले निर्णय योग्य ठरतील. दिवसाच्या उत्तरार्धात लाभ.

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)

उद्योग व्यवसायात चर्चेपेक्षा कृतीस प्राधान्य दिल्यास यशाचा मार्ग सोपा होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा व वेळेचे योग्य नियोजन करा. मित्रांच्या नादी लागू नका.

कन्या (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायातील चढा ओढ वाढेल. नोकरदारांनाही नोकरीच्या ठिकाणी काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. ज्येष्ठ मंडळींची अध्यात्माकडे रुची वाढेल.

तूळ (शुभ रंग- क्रीम)

आपल्याच एखाद्या चुकीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. जोडीदाराला लाभ होतील.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)

अत्यंत उत्साहाने व सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल.

धनु (शुभ रंग- निळा)

ध्येयप्राप्ती साठी अथक परिश्रमां शिवाय दुसरा पर्याय नाही. आज तुम्ही आरोग्याची ही काळजी घेणे गरजेचे आहे. मामा मावशी कडून महत्त्वाच्या बातम्या येतील.

मकर (शुभ रंग- जांभळा)

सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. काही रसिक मंडळी आज कामाकडे दुर्लक्ष करूनही मौजमजेस प्राधान्य देतील. सहकुटुंब सहलीचे नियोजन कराल.

कुंभ ( शुभ रंग- पांढरा)

बरेच दिवसापासूनची काही रखडलेली घरगुती कामे पूर्ण कराल. गृहिणी आज घर आवरण्यास प्राधान्य देतील. आज मुलांच्याही अभ्यासात डोकावणे गरजेचे आहे.

मीन (शुभ रंग- राखाडी)

आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. काही चुकीचे सल्ले देणारी माणसे भेटतील. ऐकावे जनाचे करावे मनाचे या धोरणाने वागा. विद्यार्थ्यांना यश सोपे नाही.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.