Today’s Horoscope 13 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

13.10.2023.

शुभाशुभ विचार- चतुर्दशी वर्ज्य. 

आज विशेष- चतुर्दशी श्राद्ध.

राहू काळ – दुपारी 10.30 ते  12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 14.11 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

————————————

मेष – ( शुभ रंग- गुलाबी )

नोकरदारांसाठी आजचा दिवस अनुकूल असून तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवतील.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी )

विविध मार्गाने अर्थ प्राप्ती होईल. सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल. आशादायी दिवस.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आनंदी व उत्साही असा दिवस असून आज कुटुंबीयांना आपला जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुमचा प्रयत्न असेल. रियल इस्टेट चे व्यवसाय आज तेजीत चालतील.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी )

विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाणार आहे. आज जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. घराबाहेर वावरताना वादविवाद टाळा शेजारी सलोखा राहील.

सिंह (शुभ रंग- लाल )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल कार्यक्षेत्रात आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतांशी ठाम राहाल.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी )

व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची ही खंबीर साथ राहील. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल.

तूळ ( शुभ रंग- जांभळा )

आर्थिक व्यवहारात सावध रहा. आज भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. रात्रीच्या प्रवासात सावध असावे. आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या खर्च वाढणार आहे.

वृश्चिक (शुभ रंग- मोतिया)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल दिवस. आज महत्त्वाची कामे उरकूनच घ्या. मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. जुनी गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल.

धनु- (शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल. अधिकारी वर्गाचे ही आज तुम्हाला चांगले सहकार्य राहील. आज फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

मकर ( शुभ रंग- पांढरा)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या ज्येष्ठांना उपासनेची चांगली प्रचिती येईल.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी )

नोकरी व्यवसायात काही मनाविरुद्ध घटलेल्या घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे.

मीन -(शुभ रंग – राखाडी )

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी वाढेल.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.