Today’s Horoscope 16 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 16 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 16.02.2024.

शुभाशुभ विचार – 9.00 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – रथसप्तमी, भीष्माष्टमी.

राहू काळ – सकाळी 10 .00  ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र -भरणी 08.47 पर्यंत नंतर कृत्तिका.

चंद्र राशी – मेष 14.43 पर्यंत नंतर वृषभ.

—————————–

मेष – ( शुभ रंग – हिरवा)

एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. उपवर तरुण-तरुणींना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.  अति उत्साहाच्या भरात आज तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल.

वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)

खर्च कितीही वाढला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

मिथुन – ( शुभ रंग- तांबडा)

सहकुटुंब एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्रांची खरेदी कराल. आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही करू नका. आज प्रिय व्यक्तीस एखादी भेटवस्तू द्याल.

कर्क – ( शुभ रंग – निळा)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र आज तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धातच लाभ संभवतो.

सिंह -( शुभ रंग – जांभळा)

आज तुम्ही भावने पेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

तूळ – ( शुभ रंग- आकाशी)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. कार्यक्षेत्रात मोहास बळी पडू नका. अनैतिक कृत्ये प्रतिष्ठेस घातक ठरू शकतात.

वृश्चिक – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची तुम्हाला खंबीर साथ राहील.

धनु – (शुभ रंग- क्रीम)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणे असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

मकर – (शुभ रंग- पिस्ता)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात तुम्ही रमाल.

कुंभ – (शुभ रंग- भगवा)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. आज मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

मीन – ( शुभ रंग- मरून)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवा. मुलांनी आईच्या आज्ञेत रहावे.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.