Today’s Horoscope 18 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 18 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 18.03.2024.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – आर्द्रा 18.11 पर्यंत नंतर पुनर्वसू.

चंद्र राशी – मिथुन.

—————————–

मेष- ( शुभ रंग- क्रीम)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाईल. रिकाम टेकड्या चर्चेतुन  काहीच निष्पन्न होणार नाही. मोफत सल्लागार मंडळींनी दिलेले असलेले ऐकून घ्यायला मात्र काही हरकत नाही.

वृषभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज अत्यंत आनंदी व उत्साही दिवस असून आज तुमचे मुदुबले उत्तम असेल कार्यक्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल नकारात्मक मंडळींपासून मात्र आज लांब राहा.

मिथुन- (शुभ रंग – हिरवा)

कमी कष्टात जास्त लाभाची अपेक्षा करून निराशास पदरात पडेल शेअर्स व्यवहारातील तुमचे अंदाज चुकू शकतात सतर्क रहा दिवसाच्या उत्तरार्धात लाभ संभवतो.

कर्क- ( शुभ रंग- पांढरा)

कमी कष्टात जास्त लाभाची अपेक्षा करून निराशास पदरात पडू शकते शेअर्स व्यवहारातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. दिवसाच्या उत्तरार्धात लाभ संभवतो.

सिंह – ( शुभ रंग- चंदेरी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने पूर्ण अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील हाताखालचे लोक आदबीने वागतील. एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे.

कन्या-  (शुभ रंग-राखाडी.)

आज तुमच्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्यायला हवे.

तूळ- ( शुभ रंग- जांभळा)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. नोकरीत वरिष्ठ जितकं विचारतील तितकेच बोला.

वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी)

काम कमी व दगदग जास्त होईल. महत्त्वाच्या चर्चेत फक्त ऐकण्याचे काम करा. आज आपले प्लॅन्स इतरांना सांगण्याची घाई करू नका. जोडीदाराचा सल्ला आज महत्त्वाचा राहील.

धनु – (शुभरंग- गुलाबी)

आज तुमचे मन चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. ताकही फुंकून प्यावे असा आजचा दिवस. पत्नी जे काही म्हणेल त्याला होच म्हणलेले बरे.

मकर- (शुभ रंग- भगवा)

आज तुमसे मनोबल कमीच असेल एखादी शिल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल भागीदारीतील काही मतभेद सुसंवादाने भेटतील काही येणी असतील तर आज वसूल होतील.

कुंभ- ( शुभरंग- मरून)

सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. आज तरुणांनी पथ्य पाणी पाळावे अन्यथा एखादा बरा झालेला आजारही उलटू शकतो. हितशत्रू टपूनच बसलेले आहेत.

मीन – (शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा रथ वेगाने घोडदौड करेल. आज कुटुंबीयांनाही पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. काही प्रिय मित्र मैत्रिणीच्या सहवासात चैन कराल.

  शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.