Today’s Horoscope 21 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – मंगळवार.
तारीख – 21.11.2023.
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – कुष्मांड नवमी.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र -शततारका 20.01 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ.
मेष ( शुभ रंग – सोनेरी)
आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा.
वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्या.
मिथुन ( शुभ रंग- केशरी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.
कर्क ( शुभ रंग – लाल)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांना सत्संगाकडे पावले वळवावीच लागतील.
सिंह ( शुभ रंग – पिस्ता)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात सुसंवाद महत्त्वाचा राहील.
कन्या ( शुभ रंग- जांभळा)
नोकरदार वरिष्ठांची शाब्बासकी मिळवतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. वैवाहिक जीवनात गप्पच राहणे हिताचे.
तूळ ( शुभ रंग- राखाडी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.
वृश्चिक ( शुभ रंग – मरून)
व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असतील.
धनु (शुभ रंग- मोतिया)
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. तरुणांनी कुसंगती पासून दूर राहावे. व्यसने टाळा.
मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असल्याने आज गुंतवणुकीस प्राधान्य द्या.
कुंभ (शुभ रंग- आकाशी)
तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणं ऐकून घेणे गरजेचे आहे. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकेल याचे भान ठेवा.
मीन ( शुभ रंग- भगवा)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होईल सतर्क रहा.